मीरारोड - काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरांमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला १० जुलै रोजी माहिती मिळाली की बी-५०१ , चैतन्य अरुणोदय हाईट, डॉन बास्को रोड, मीरागाव येथे घरामध्ये जुगार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, विजय निलंगे , रामचंद्र पाटील, वैष्णवी यंबर, कमल चव्हाण तसेच काशीमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुल्ला, जरग आणि राकडे यांनी छापा टाकला. घरामध्ये १० स्त्री - पुरुष पैसे लावून तीन पत्त्यांचा जुगार खेळताना सापडले. त्यावेळी त्यांच्याकडून १० पत्यांचे कॅट व रोख रक्कम ३४ हजार ४३० रुपये मिळून आली आहे.