जळगाव : एका वर्षासाठी हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख रा. अजमेरी गल्ली तांबापुरा यास त्याच्या घरातून रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला घरात लपवून आश्रय देणार्या त्याच्या आईवडीलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरा परिसरातील अजमेरी गल्लीतील रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. पोलीस अधीक्षकांनी त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. काल्या हा घरी आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, सपना येरगुंटला यांचे पथक तयार करुन त्याला अटक करण्यासाठी पाठविले.
वरच्या मजल्यावर लपलेला होता काल्यारविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास पोलीस काल्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता. त्याचे वडील गयासोद्दीन शेख व आई जाकीयाबी शेख हे घराबाहेर आले. पोलिसांनी त्यांना काल्या घरी आहे का याबाबत विचारणा केली असता तो नाही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या घराची झडाझडती घेण्यास सुरुवात केली. दरम्यान काल्या हा घराच्या वरच्या मजल्यावर टेन्ट हाऊसच्या चटईमागे लपलेला असल्याचे पोलीसांना आढळून आले. काल्यासह त्याच्या
आई वडीलांनाही अटकहद्दपार काल्याला आश्रय दिल्याने त्याचे वडील गयासोद्दीन शेख व आई जाकीयाबी शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपी काल्याला हटकर व शिकलकर या दोन्ही गटात झालेल्या दंगलीत अटक केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक
बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ
महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन