शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पोलीस खबरीचा पाठलाग करत हवेत गोळीबार करणाऱ्या अमली पदार्थ तस्कर टोळीच्या ६ जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2022 5:36 PM

दहिसर भागातून अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या ह्या टोळीचा म्होरक्या सनी सालेकर असून तो सध्या कारागृहात आहे .

मीरारोड - अमली पदार्थ विक्रेत्यास पकडून देणाऱ्या पोलिसांच्या खबरीचा पाठलाग करून तो न सापडल्याने हवेत गोलीबार करून पसार झालेल्या अमली पदार्थ तस्करी - विक्री करणाऱ्या माफिया टोळीच्या ६ जणांना मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे . 

 घोडबंदर गाव परिसरात राहणाऱ्या एका पोलिसांच्या खबरी ने दहिसर मधून अमली पदार्थांची विक्री करण्यास येणाऱ्या एका टोळीच्या तस्करास अमली पदार्थ विरोधी पथका द्वारे पकडून दिले होते .  आपल्या टोळीच्या सदस्यास पकडून दिल्याचे समजल्यावर टोळीतील सदस्यांनी त्या खबरीचा काटा काढायचा म्हणून ३ जूनच्या पहाटे १ च्या सुमारास त्याचा पाठलाग केला . खबरी दुचाकी वरून चालला असताना त्याचा एक कार व एका दुचाकी वरून पाठलाग चालवला असता खबरी घोडबंदर गावा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका आडोशाला लपला . पाठलाग करणारे पुढे वैभव शेठ कंपनी पर्यंत गेले असता खबरी न सापडल्याने त्यांनी बंदुकीतून २ गोळ्या हवेत फायर केल्या . 

या प्रकरणी ३ जून रोजी काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल होऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ . महेश पाटील व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल राख व गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुऱ्हाडे , अमली पदार्थ विरोधी शाखेचे निरीक्षक देविदास हांडोरे व पथकाने  तांत्रिक विश्लेषण , गोपनीय बातमीदार यांचेकडून आरोपी निष्पन्न केले . 

पोलिसांनी शनिवारी विशाल ऊर्फ गचक्या मुत्तुस्वामी (२०) रा . खान कंपाऊंड शनी मंदिर चौक जवळ, दहिसर;  राहुल ऊर्फ बॉक्सर विश्वकर्मा (२७) रा . पुनम अवेन्यु, ग्लोबल सिटी विरार;  किशोर ऊर्फ कांच्या सिंग (२७) रा . संभाजी नगर चाळ, एस. व्ही रोड, दहिसर ; अनुराग  म्हात्रे (२०) , रा. गायत्रीधाम , प्लेझंट पार्क, मीरारोड ;  अभिजीत सुधाकर पाष्टे (२८) , रा . चंदनसार, विरार व विकास ऊर्फ विकी निणानिया (३०) रा. मनवेल पाडा, विरार ह्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे . आरोपीं कडून १ गावठी पिस्तूल , २ मॅग्झीन, ५ जिवंत काडतुसे तसेच गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी व कार जप्त करण्यात आली आहे . 

दहिसर भागातून अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या ह्या टोळीचा म्होरक्या सनी सालेकर असून तो सध्या कारागृहात आहे . त्याच्या टोळीतील सदर अटक केलेल्या आरोपीं पैकी काही जणांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली . काशीमीरा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .