वास्को - खारीवाडा, वास्को येथे राहणाऱ्या १८ वर्षीय सोहेल खान या युवकाला वास्को पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ५ दुचाकी जप्त केल्या. ड्रायव्हरहील, वास्को येथील सुरेश लमाणी याने त्याची मोटरसायक चोरीला गेल्याची तक्रार सोमवारी (दि.१८) पोलीसात नोंद केल्यानंतर सोहेल याला अटक करून प्रथम ती मोटरसायकल जप्त केल्यानंतर त्याच्याकडून अन्य चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोहेल खान याला सोमवारी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या. सुरेश ने त्याची पार्क केलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर यात चौकशीला सुरवात केली असता ती दुचाकी सोहेल या युवकाने चोरी केल्याची माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्वरित सोहेलला अटक करून त्याच्याशी कसून चौकशी केली असता त्यांने ती दुचाकी चोरल्याची कबूली दिली. तसेच त्यांने अन्य दुचाकी चोरल्याची माहीती पोलीसांशी असल्याने याबाबतही चौकशी केली असता चोरीला गेलेल्या पाच दुचाकी त्याच्याशी असल्याचे उघड झाले. नंतर पोलीसांनी सोहेलने दिलेल्या माहीतीनुसार खारीवाडा हिंदु स्मशानभूमी बाहेरील परिसरात लपवून ठेवलेल्या त्या पाचही दुचाकी जप्त केल्या. जप्त केलेल्या पाच दुचाकीपैंकी तीन वास्कोतील तर दोन पणजी येथील असल्याची माहीती प्राप्त झालेली असून यापैंकी चार दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार पोलीसात नोंद आहे.
१८ वर्षीय सोहेल खान याचा अन्य दुचाकी चोरी प्रकरणात अथवा अन्य कुठल्या चोरी प्रकरणात हात आहे काय याबाबतही पोलीस चौकशी करित आहेत. दरम्यान मंगळवारी (दि.१९) वास्को पोलीसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केला असता त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजाविला. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.