ग्वाल्हेर - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं सोनसाखळी चोर आणि लुटीच्या अनेक घटनांनी पोलीस त्रस्त होते. शनिवारी या तपासात पोलिसांना मोठं यश मिळाले. या घटनेमागील चोरांना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या टपाल विभागात काम करणारा सरकारी कर्मचारी आहे. तो ग्वाल्हेर येथे कोचिंग सेंटरही चालवतो. सुपर रिच बनण्याच्या नादात त्याची लूट आणि चोरीच्या गुन्हेगारी क्षेत्रात वळला. गुन्हेगारी जगतात त्याने कोचिंगमधील विद्यार्थ्यांनाही जोडले. आरोपी टीचर हा चांगल्या घराण्याशी संबंधित आहे.
ग्वाल्हेरचे एसपी राजेश सिंह चंदेल म्हणाले की, आमच्यासाठी हे मोठे यश आहे कारण पकडलेल्या आरोपींचा कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड नव्हता. या टोळीचा म्होरक्या हा एक शिक्षक आहे. गुन्हेगारीच्या माध्यमातून त्याला लवकर श्रीमंत व्हायचे होते. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेले मोबाईलही जप्त केलेत. मिळालेल्या माहितीनुसार, संजीव शाक्य हा टपाल विभागातील सरकारी कर्मचारी आहे. त्याला जलद श्रीमंत होण्याची इच्छा होती. त्याच लालसेपोटी तो ग्वाल्हेरला आला. तिथे कोचिंग सेंटर सुरू केले. या कोचिंग सेंटरला तो ज्ञान देत नव्हता तर गुन्हेगारीचा धडा देत होता. त्यातील बरेचजण असे आहेत की ज्यांचा याआधी गुन्हेगारी क्षेत्राशी काहीही संबंध नाही. या मुलांच्या माध्यमातून तो लूट करायचा.
या टोळीचं लक्ष्य महिलांवर असायचे. निर्जन ठिकाणांवरून जाणाऱ्या महिलांना लुटून ते पसार व्हायचे. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाईंड पकडला आहे परंतु टोळीतील इतर आरोपी अद्याप पसार आहेत. टोळीचा म्होरक्या संजीव शाक्य हुशार होता. १२ वीमध्ये त्याला ९३ टक्के मिळाले होते. तो सरकारी नोकरी करत होता पण त्याला एक महत्त्वाकांक्षा होती. लवकरच त्याला श्रीमंत व्हायचे होते. त्याचसाठी त्याने गुन्हेगारीचा शॉर्टकट पकडला. ज्यात अनेक विद्यार्थ्यांना त्याने आमिष दाखवून सामील केले.
आरोपी कोचिंग टीचरने आतापर्यंत १२ चोऱ्या केल्या आहेत. मास्टरमाईंड चांगल्या घराण्याशी संबंधित आहे. त्याला त्याच्या मोठ्या भावासारखे पैसे कमवायचे होते. त्यामुळे तो शॉर्टकट वापरून त्याचे स्वप्न साकार करत होता. सुरुवातीला त्याने मोबाईल लंपास केले. त्यानंतर फायदा पाहून त्याने सोन्याचे दागिनेही लुटले. मोबाईल, ज्वेलरी, मंगळसूत्र अशा चोऱ्या ते करायचे. चोरीसाठी जे वाहन वापरायचे त्याचे नंबर प्लेटही बदलले जायचे किंवा हटवले जायचे. त्यामुळे अनेक महिला पोलीस तक्रारीत वाहनाचा नंबर सांगू शकत नव्हत्या.