शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:21 PM

तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

पुणे : अनधिकृत सिगारेट बॉक्स खरेदी केल्याचा संशय घेत त्यावरुन कारवाईची भीती घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास वीस हजारांची लाच घेताना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम पाहणा-या संजय भिला वाघ (वय ३८) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.  तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर ती रक्कम २० हजार घेण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी मुंबई पुणे हायवेसमोरील एका हॉटेलसमोर सापळा रचून त्याला पकडले. सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजु चव्हाण, पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, पोलीस हवालदार सुनील शेळ्के, पोलीस नाईक श्रीकृष्ण कुंभार, विनोद झगडे यांचा समावेश होता.  

कारवाई होऊ नये म्हणून घेतली २२०० रुपयांची लाच वाहन चालविण्याच्या परवान्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करु नये याकरिता २२०० रुपयांची लाच स्वीकारणा-या पौड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक योगेश सवाणे याला देखील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. तक्रारदाराला आपल्या गाडीत बोलावून त्याच्याकडे लाचेची मागणी केली. मात्र कारवाईची चाहुल लागताच आरोपीने धोकादायक व बेदरकारपणे वाहन चालवत पळ काढला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस शिपाई किरण चिमटे, पोलीस हवालदार गायकवाड, नवनाथ माळी आदी कारवाईत सहभागी होते. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारArrestअटकPoliceपोलिस