चाकण : जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या सोडविण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची मागणी करून १ लाख रुपयांवर तडजोड झाल्यानंतर पहिला हप्ता म्हणून ५० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईक कर्मचाऱ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले. ४१ कारवाई गुरुवार ( दि. २० ) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यात झाली. चाकण पोलीस ठाण्यातील शरद कृष्णा लोखंडे ( बक्कल नं. २४६ ) असे ताब्यात घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे, अशी माहिती एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार ( वय २८ ) यांच्या वाळुच्या गाड्या सोडण्यासाठी लोकसेवक पोलीस कर्मचारी लोखंडे याने तक्रारदाराची ब्रिझा कार ठेवून घेतली. व स्टँम्प पेपरवर आरोपी आनंदा नामदेव शिवळे (वय ४२, खाजगी इसम, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे ) याच्यासोबत पैसे देण्याघेण्याचा व्यवहार दाखविला. ती ब्रेझा गाडी सोडण्यासाठी व स्टँम्प पेपर फाडुन टाकण्यासाठी आरोपी लोखंडे यांनी तक्रारदाराकडे १ लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती १ लाख रुपयावर सेटलमेंट झाले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची १९ जूनला पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज ( दि. २० जून ) ला सापळा रचला. त्यावेळी पोलीस नाईक लोखंडे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये सरकारी पंचासमक्ष स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांना एसीबी पथकाने त्वरित ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्यानंतर प्रथमच चाकण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ५० हजाराची लाच स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस निरीक्षक क्षीरसागर, पो. हवा. शेळके, सपोफौ उदय ढवणे, पो.कॉ.किरण चिमटे, पो. कॉ. माळी यांच्या पथकाने सापळा रचून हि कारवाई केली. ====================================
चाकण येथे पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:13 PM
चाकण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ५० हजाराची लाच स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देजप्त केलेल्या वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी पोलिसाने ठेवून घेतली होती ब्रिझा कारगाड्या सोडण्यासाठी एक लाखाची मागितली लाच, पन्नास हजार स्वीकारताना एसीबीचा छापापोलीस नाईकासह खासगी इसमावर गुन्हा दाखल, पुणे एसीबीची कारवाई