मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे फुलझाडांच्या कुंडया आणि खिडक्यांच्या काचांची तोड़फोड़ करणाऱ्या दुकलीपैकी एकाला गुरूवारी रात्री माटुंगा पोलिसांनीअटक केली आहे. तर तोड़फोड़ करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी घड़लेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, घटनास्थळावर तोड़फोड़ करणाऱ्या आरोपीसोबत आणखीन एक व्यक्ती असल्याचे दिसून आले. याच दरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेतलेली व्यक्ती तीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी उमेश जाधव (३५) याला चौकशीअंती गुरूवारी रात्री अटक केली आहे. जाधव हा परेलचा रहिवासी असून बिगारीकाम करतो. त्याच्या चौकशीतून तोड़फोड़ करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तोड़फोड़ प्रकरणानंतर प्रशासनाने कड़क पाऊले उचलेली दिसून आली. राजगृहाबाहेर २४ तास सुरक्षेबरोबरच, गुरूवारी राजगृहासमोरील दोन बस थांबेही सुरक्षेच्या कारणात्सव हटविण्यात आले आहे.
राजगृहाबाहेरच असलेल्या या दोन बस थांब्यावर प्रवाशांची येजा असायची. भविष्यात या थांब्यावरून राजगृहावर पाळत ठेवणे शक्य असल्याने हे दोन्ही थांबे हटविण्यात आले आहेत. तसेच परिसरातही पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...