शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

आरोग्य खात्याचा बनावट ना हरकत दाखला तयार करणारे त्रिकुट गोव्यात गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 9:52 PM

मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब पुढील तपास करीत आहे.

ठळक मुद्दे भारतीय दंड संहितेच्या 420, 465,468 व 471 कलमाखाली पोलिसांनी या संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यअधिकारी डॉ. अंजू खरंगटे या तक्रारदार आहेत. 

मडगाव - आरोग्य खात्याचा बनावट ना हरकत दाखला तयार करुन हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा डाव गोव्यात एका व्यवसायिकाच्या अंगलट आला. फसवणूक प्रकरणात गोव्यातील मडगाव पोलिसांनी त्रिकुटाला गजाआड केले. हॉटेलमालक विमलकुमार याच्यासह पोलिसांनी रुतम्मा सोमी अदाम व रोशन बोरकर या तिघांच्या मुसक्या आवळल्या. भारतीय दंड संहितेच्या 420, 465,468 व 471 कलमाखाली पोलिसांनी या संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब पुढील तपास करीत आहे.

मडगाव येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यअधिकारी डॉ. अंजू खरंगटे या तक्रारदार आहेत. विमलकुमार याने मडगावातील कालकोंडा या भागात हॉटेल सुरु करण्यासाठी रुतम्मा सोमी अदाम व रोशन बोरकर या दोघांना हाताशी धरुन हा ना हरकत दाखला मिळविला होता. हा दाखला खरा असल्याचे भासवून त्याने तो आपल्या दुकानात लावला होता. या प्रकरणाची माहिती आरोग्य खात्याला मिळाल्यानतंर आरोग्याधिकारी डॉ. अंजू खरगंटे यांनी या हॉटेलात जाउन पहाणी केली असता, हा दाखला बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर या संबधी पोलिसांत तक्रार नोंदविली.

टॅग्स :ArrestअटकfraudधोकेबाजीPoliceपोलिसgoaगोवा