शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांकडून मारहाण; गुन्हा नोंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:12 PM

न्या. रणजित मोरे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

ठळक मुद्देअंधेरीतील आंबोली पोलीस स्थानकातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टाने दिले आहेत. कारवाई न झाल्याने अखेरीस वकील प्रशांत अहिरे यांच्यामार्फत समीर शेखने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई - वाहतुकीची नियम दिवसेंदिवस कडक होत असताना हायकोर्टाने कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांना दणका दिला आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या अंधेरीतील आंबोली पोलीस स्थानकातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टाने दिले आहेत. या मारहाणीत तक्रारदाराला गंभीर दुखापत झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं. याची दखल घेत न्या. रणजित मोरे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांच्याच पोलीस स्थानकाला दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराविरोधात पोलिसांनी कलम 353 अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत आरोपपत्रही कोर्टात दाखल केलेलं आहे. मात्र त्या प्रकरणात आरोपीला दंडाधिकारी कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे.समीर शेख हा २९ वर्षीय युवक १४ डिसेंबर २०१८ रोजी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळून आपल्या नातेवाईकासह दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करत होता. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने त्याला थांबवून दंड भरण्यास सांगितला. मात्र, याला युवकाने विरोध करताच पोलीसांसोबत त्याची शाब्दिक चमकम सुरू झाली. या घटनेचे समीरने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यास सुरूवात केली. हे पाहताच पोलीसांनी त्याला हटकलं आणि त्याचा मोबईल काढून घेत त्याला जवळच्या बीट चौकीत घेऊन गेले. तिथं नेल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पाच पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केली. ज्यात एका महिला पोलीस हवालदाराचा देखील समावेश आहे असा युवकाने आरोप केला.याप्रकरणी तक्रारदार युवकाने पोलीस कॉन्स्टेबल शरद सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के,  महिला हवालदार संगीता कांबळे, पोलीस निरीक्षक सागर आणि पोलीस हवालदार सागर कोडविलकर यांच्याविरोधात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपुढे वारंवार तक्रार केली. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. उलट आपल्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी या याचिकेतून केला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत ४ फेब्रुवारी २०१८ रोजी दिंडोशी कोर्टाने विनाहेल्मेटसाठीचा दंड वसूल करण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्या मुंबई पोलिसांवर चांगलेच ताशेर ओढले होते. पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश देऊनही काहीच कारवाई न झाल्याने अखेरीस वकील प्रशांत अहिरे यांच्यामार्फत समीर शेखने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालयtraffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईAndheriअंधेरी