मुंबई : कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढावली असताना, दोन दिवसांपासून जेवायला नाही म्हणून एका महिलेने शुक्रवारी जे. जे. पुलावरुन उड़ी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसाच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले.
सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे हे रात्रपाळीसाठी दुचाकीवरुन निघाले. ते एमआरए मार्ग पोलीस वसाहतीत राहण्यास आहे. वाटेत जे जे मार्ग पुलावरुन एक महिला उड़ी मारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकी तेथेच थांबवून महिलेकडे धाव घेतली. तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र साहब मरने दो मुझे. दो दिनसे ख़ाना नही.' म्हणत ती रडत होती. मात्र देशपांडे यांनी तिची समजूत काढत तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, ती ताणावात असल्याने एकन्याच्या मनस्थितित नव्हती. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस मदत घेतली. त्यांनुसार एमआरए मार्ग पोलीस तेथे आले. त्यांनी याबाबत महिलेला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिचे मानसिक संतुलन बरोबर नसल्याचे पोलिसांकड़ून सांगण्यात आले. पोलिसांनी महिलेचे समूपदेशन तसेच मदत करत तीला घरी धाडले.