मुंबई - गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून बाप्पाची नानाविध रूप भाविक साकारतात. तसेच विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी आपल्या विले पार्लेतील राहत्या घरी तिसऱ्यांना वाहतूक पोलिसांच्या गणवेशातील अतिशय मनमोहक बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.
निरीक्षक राजेंद्र काणे यांनी वाहतूक पोलिसांच्यावर्दीतील श्रीगणेशाच्या मूर्तीसह सुंदर देखाव्याची सजावट करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस वर्दीतील पोलीस गणेश हा दुचाकीवर बसून सवार झाला आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत संदेश देणारा हा पोलीस बाप्पा भाविकांना भावला आहे. अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेबद्दल काणे यांना विचारले असता त्यांनी मी लहान होतो, त्यावेळी कोल्हापूर येथील लाईनबाजारमध्ये ५ वीला शिकत असताना वर्गातल्या शिक्षकांनी गणेशोत्सवात शिक्षकाच्या वेशातील गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावरून मला ही संकल्पना सुचली. पोलीस विभागात काम करत असताना त्याच क्षेत्रातील गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे स्वप्न मनात होते. त्यामुळे अशी पोलिसांच्या वर्दीतील मूर्तीची स्थापना गेल्या वर्षी आणि यंदा केली आहे. यासाठी ४ ते ५ वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो.