नवी दिल्ली - मध्य प्रदेशात हनीट्रॅपचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात फसवणाऱ्या इंदूरच्या दोन मुलींना आणि भोपाळच्या तीन मुलींना पोलिसांनीअटक केली आहे. मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून या मुली पैसे उकळायचे काम करत असत.
इंदूरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद युसूफ कुरैशी यांनी या सर्व मुलींकडे चौकशी केली जात असून त्याचसोबत या टोळीने कोणाकोणाला आपले टार्गेट बनविले आहे याची देखील चौकशी सुरु असल्याचे सांगितले. इंदूरमधील एका अधिकाऱ्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तपास सुरु केला असता इंदूरहून दोन मुलींना अटक करण्यात आली. त्यानंतर भोपाळमधून तीन मुलींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.