म्हापसा : कांदोळी येथे एका व्हिलावर छापा टाकून ‘आयपीएल’मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट सामान्यावर बेटिंग घेणाऱ्या एका रॅकेटचा कळंगूट पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी राजस्थान तसेच नेपाळमधील मिळून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई दि. ३० सप्टेंबर रात्री करण्यात आली.संशयितांकडून ९५ हजार रोख, २ लॅपटॉप, ९ मोबाईल संच असा ऐवज जप्त केला. त्यानंतर संशयितांवर गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ चे उल्लंघन केल्याबद्दल कळंगूट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. कळंगूट पोलिसांच्या माहितीनुसार, राजू सिंग (२५, राजस्थान), मोहित कुमार (२१, राजस्थान), रवी ममतानी (३०, राजस्थान), सुरज सोनी (२८ रा. नेपाल), सागर सिंग राठोड (राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.संशयितांना नंतर १० हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक विराज नाईक हे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्क्रिष्ट प्रसून व उपअधीक्षक एडविन कुलासो तसेच पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. या कारवाईच्या पथकात निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक विकास देयकर, पोलीस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, सुरेश नाईक, चालक सुनील म्हालसेकर यांचा समावेश होता.
‘IPL’वर सट्टा लावणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला, पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 3:57 PM
IPL Betting : याप्रकरणी राजस्थान तसेच नेपाळमधील मिळून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई दि. ३० सप्टेंबर रात्री करण्यात आली.
ठळक मुद्देकळंगूट पोलिसांच्या माहितीनुसार, राजू सिंग (२५, राजस्थान), मोहित कुमार (२१, राजस्थान), रवी ममतानी (३०, राजस्थान), सुरज सोनी (२८ रा. नेपाल), सागर सिंग राठोड (राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.