शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

Nashik: पोलिसांनी नाशकातील देहविक्रय अड्डा बंद केला; पेट्रोलने पेटवून घेण्याची धमकी जुमानली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 11:32 PM

Nashik Bhadrakali Area: भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली, तसेच संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पाठीमागील भींतीला लागून असलेल्या शिवाजीरोडलगतच्या देहविक्रयचा जुना अड्डा पोलिसांनी धाडस दाखवून बंद केला.

नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील देहविक्रयचा तो सर्वात जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गल्लीतील खोल्या अखेर पोलिसांनी गुरुवारी (दि.९) धडक कारवाई राबवून कायमच्या ‘सील’ केल्या. हा सील पुन्हा तोडू नये, यासाठी परिसरात पोलिसांनी फॅब्रिकेशन कामागारांमार्फत पत्रे लावून घेत वेल्डींगदेखील करुन घेतल्याचे सांगण्यात आले. 

भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली, तसेच संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पाठीमागील भींतीला लागून असलेल्या शिवाजीरोडलगतच्या देहविक्रयचा जुना अड्डा पोलिसांनी धाडस दाखवून बंद केला. यापुर्वी अनेकदा याठिकाणी छापे पडले. गुन्हे दाखल झाले; मात्र येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांना यापासून परावृत्त करत हा व्यवसाय बंद करण्यास वारंवार पोलीस अपयशी ठरले होते. काही महिन्यांपुर्वीच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नोटीस बजावून ठाकरे गल्लीतील देहविक्रय करणाऱ्यांना तातडीने स्थलांतरीत होण्याचे आदेश देत जागा मालकाला कारवाई का करु नये, अशी कारणेदाखवा नोटीसही बजावली होती. मात्र याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करणे पसंत केले गेले.

आठवडाभरापुर्वीच पाण्डेय यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६च्या कलम७ नुसार अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत त्यांनी प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था, वसतीगृह, रुग्णालय, नर्सिंगगृह आदी सार्वजनिक ठिकाणांपासून २००मीटरच्या अंतरापर्यंत देहविक्रय करण्यास प्रतिबंध असल्याचे घोषित केले. यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा व भद्रकाली पोलिसांनी त्यांच्या आदेशान्वये भर बाजारपेठेतील सार्वजनिक ठिकाणांना लागून असलेला देहविक्रयचा अड्डा गुरुवारी सील केला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय पवार, पोलीस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल, कुंदन जाधव, दुय्यम निरिक्षक दिलीप ठाकुर सहायक निरिक्षक प्रणिता पवार यांच्या नेृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

ध्वनिक्षेपकावरुन सुचना देत ‘डेडलाईन’यावेळी सुरुवातीला पोलिसांनी वाहनांच्या ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा करत महिलांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आणि मर्यादित स्वरुपाचा त्यासाठी वेळ दिला. यानंतरही काही महिलांनी खोल्या सोडण्यास नकार देत असहकार्याचा पवित्रा घेतला तर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली. यावेळी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत त्यांना समज देत त्वरित बाहेर काढले. सर्व खोल्यांची पंचांसमक्ष बारकाईने तपासणी करुन घेत खोल्या कुलुपबंद करुन घेत शासकीय पद्धतीने सील केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी