मुंबईत एका हवालदारानं त्याच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यामुळे संबंधित हवालदाराला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. अश्लील व्हिडिओ शेअर करणारा स्वत: त्या व्हिडिओत दिसून येत आहे तर महिला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
मुंबई पोलिसात कार्यरत असलेला आरोपी अभिजीत परब एका व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये होता. ज्यात नेहमी अश्लील व्हिडिओ टाकले जायचे. त्या ग्रूपमध्ये इतरही कर्मचारी होते. ९ डिसेंबर रोजी परबनं त्याच ग्रूपवर चक्क स्वत:चा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ पोस्ट केला. जो ग्रूपमधील सर्व सदस्यांनी पाहिला.
व्हिडिओ डाऊनलोड झाल्यानंतर ग्रूपमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कारण व्हिडिओमध्ये हवालदार परब सोबत दिसणारी महिला सहकारी हवालदाराची पत्नी होती.
ज्या कर्मचाऱ्याची पत्नी व्हिडिओत दिसली त्यानं पत्नीला याचा जाब विचारला. त्यानंतर त्यानं आरोपी परब याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास पत्नीला सांगितलं. पण पत्नीनं तक्रार दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर पतीनं नातेवाईकांना सगळा प्रकार सांगून तिला सातऱ्याला तिच्या माहेरी पाठवून दिलं.
९ डिसेंबर रोजी हवालदार अभिजीत परब, पत्नी विरोधात हवालदारानं तक्रार दाखल केली. ज्या ग्रूपमध्ये व्हिडिओ शेअर करण्यात आला होता त्यात १२६ सदस्य होते. पोलीस कर्मचाऱ्यानं आरोप केला आहे की या व्हिडिओमुळे आपली प्रतिष्ठा डागाळली केली आहे. जाणीवपूर्वक संबंधित व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये अश्लील कंटेन्ट असल्यामुळे आयपीएस कलम २९२, २९३ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अश्लील माहिती शेअर करण्यासंदर्भातील गुन्ह्याची नोंद करण्यात आळी आहे. पीडित पोलीस हवालदारानं आरोपी परब विरोधात अब्रुनुकसानीचाही दावा ठोकला आहे.
आरोपी परबला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आणि त्याची विभागीय चौकशी देखील सुरू झाली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला निलंबीत करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जात आहे.