हैदराबादमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणाऱ्या एका टोळीचा रविवारी पर्दाफाश केला. यात पोलिसांनी भाजपाचे उमेदवार एम. रघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाकडे १ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत हैदराबाद पोलिसांनी दोन लोकांना बेगमपेट परिसरात पकडले. त्यांच्याकडून १कोटी रक्कम, इनोव्हा आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
हे दोघे एका वाहनातून रोकड घेऊन जात होते. सर्व पैसे मतदारांना कथित स्वरुपात वाटण्यात येणार होते. या कारवाईत पोलिसांनी सुरभी श्रीनिवास राव आणि वाहनचालक टी. रवीकुमार यांना अटक केली. सुरभी हा भाजप उमेदवार रघुनंदन यांचा मेहुणा आहे. पोलिसांनी ३ नोव्हेंबरला दुब्बक विधानसेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवणडणुकीच्या पार्श्वभूईवर ही रक्कम जप्त केली आहे. सुरभी श्रीनिवास राव दुब्बक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटण्याच्या उद्देशाने ही रक्कम घेऊन जात होता, असे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे भाजपाने हे वृत्त फेटाळले आहे. भाजपाने हा TRS पक्षाचा आम्हाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं सांगितले. पोलिसांनी याआधी देखील २६ ऑक्टोबर या दिवशी रघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाच्या घरातून १२.८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.