शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 7:25 PM

Missing Grandfather : लोकमत आणि पोलिसांमुळे अनोळखी आजोबा कुटुंबात सुखरूप पोहोचले

ठळक मुद्देरील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

नरेश डोंगरेनागपूर : वृद्धत्त्वामुळे स्मरणशक्तीने दगा दिलेले ८५ वर्षीय आजोबा तीन दिवसांपासून हिंगणा मार्गावर भटकत जीवन मरणादरम्यानची लढाई लढत होते. उपाशी असल्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता आणि तीव्र उन्हामुळे त्यांच्या जीवाची काहिली होत होती. ते रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्याला मदतीची याचना करत होते. मात्र कोरोनाच्या धाकामुळे कुणीच त्यांना मदत करीत नव्हते. ही बाब एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला कळवली. त्यांनी डीसीपी नूरुल हसन यांना कळवले. लगेच सूत्र हलले अन या आजोबांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर पोलिसांनी त्यांचे कुटुंबीयही मिळवून दिले. रील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

 

एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला शनिवारी दुपारी ३.३० ला फोन करून अनोळखी आजोबांचा व्हाट्सएपवर फोटो पाठविला. फोन करून त्यांची दयनीय अवस्थाही सांगितली. लोकमत प्रतिनिधीने पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांना ही माहिती देऊन मदत मागितली. त्यांनी लगेच प्रतापनगरचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांना वृद्धाच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठवले. ठोसरे तसेच त्यांचे सहकारी किशोर इंगळे, विशाल गुडे, संजय वानेरे आणि गजानन पवार यांनी अनोळखी आजोबांना मदतीचा हात देऊन मेडिकलमध्ये पोहोचवले. त्यांना वृद्धत्वामुळे स्मरणशक्तीची समस्या असल्याने आपले नाव व पत्ता सांगता येत नव्हता. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या अनोळखी आजोबांवर मेडिकलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दुसरीकडे पोलिसांनी आजोबांची ओळख पटविण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तीची यादी शोधली. त्यातून धागा मिळाला. वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मिसिंग कंप्लेंट वरून त्यांच्या घरच्यांना संपर्क करण्यात आला आणि अनोळखी आजोबांची ओळख पटली. त्यांचे नाव शंकरराव महादेवराव इंगोले असल्याचे स्पष्ट झाले. ते वाडी कंट्रोलमध्ये राहतात. पोलिसांनी लगेच इंगोले परिवाराशी संपर्क करून त्यांना बोलवून घेतले. फोटो वरून ओळख पटविल्यानंतर त्यांचे दोन्ही मुले आणि इतर नातेवाईक रविवारी दुपारी मेडिकलमध्ये पोहोचले. तेथून त्यांनी शंकरराव यांना ताब्यात घेऊन आपल्या घरी नेले.भरल्या कंठाने आभार शंकरराव निवृत्त रेल्वे पोलिस कर्मचारी होय. त्यांना इंद्रकुमार आणि नंदू ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. सगळ्यांचे लग्न झाले असून त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. ते २९ एप्रिलला घरून निघून गेले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांना सारखे शोधत होते. आज दुपारी पोलिसांनी शंकराव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणल्यानंतर कुटुंबीय ओक्साबोक्शी रडले. लोकमत मुळे तुमचे वडील मिळाल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर इंद्रकुमार यांनी फोन करून भरल्या कंठाने लोकमतचे आभार मानले.
सोशल मीडिया मीडियावरही कौतुक शनिवारी दुपारी अनोळखी आजोबा आणि पोलिसांच्या तत्परतेची स्टोरी लोकमत प्रतिनिधीने व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. तेव्हापासून सोशल मीडियावरही लोकमत तसेच पोलिसांवर अनेकांनी प्रशंसा केली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसnagpurनागपूरFamilyपरिवार