शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 5:53 PM

Arrest : सोन्याचे दागिने व दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

ठळक मुद्देगणेश उर्फ सुभान संजय करावडे वय 31 राहणार निळजे डोंबिवली, साईनाथ प्रकाश गायकवाड वय 23 राहणार घाटकोपर अशी या चोरांची नाव आहेत.

ठाणे : केबल दुरुस्तीच्या बहाण्याने वृद्ध नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना ठाणे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. गणेश उर्फ सुभान संजय करावडे वय 31 राहणार निळजे डोंबिवली, साईनाथ प्रकाश गायकवाड वय 23 राहणार घाटकोपर अशी या चोरांची नाव आहेत, ह्या दोघांपैकी करावडे हा अट्टल नीरढावलेला  चोर आहे, अशाच चोरीच्या केस मध्ये तो  अडीच वर्षांपासून जेल मध्ये होता,17 सप्टेंबर 2019 रोजी तो जमिनावर सुटला होता, त्या नंतर लोकडाऊन सुरु झाल्या मुळे त्याला काही करता येत नव्हते, पण नंतर त्याने परत चोरीचा धंदा सुरु केला, करावडे हा पहिला घाटकोपर येथे राहायला होता, त्यामुळे त्याची मैत्री साईनाथ गायकवाड बरोबर होती, आपल्या या चोरीच्या धंद्यामध्ये त्याने साईनाथला सुद्धा सामील करून घेतले, हे दोघेही मोटारसायकल वरून येऊन वृद्ध नागरिकांना टार्गेट करत असत, जास्त करून ज्याची मुलं परदेशी आहेत घरात वृद्ध दाम्पत्य एकटेच राहतात अशा सोसायट्यांना ते हेरायचे, नौपाड्या येथील काही  उच्चब्रू सोसायटी मध्ये जाऊन एकट्या दुकट्या राहणाऱ्या  वृद्ध नागरिकांच्या घरात घुसून मी  केबल वाला  आहे  तुमची केबल चेक करायला आलो आहे, असे सांगुन केबलची वायर काडून टाकायचा ,सेट टॉप बॉक्स मधील वायर खराब झाली आहे तिला घासायला सोन्याची तार  लागेल, पण ती नसेल तर तुमच्या कडची सोन्याची चैन किंवा सोन्याचा दागिना द्या वायर घासून तुम्हाला परत देतो असे सांगायचा, सोन दिल्या नंतर जरा पाणी द्या किंवा लांब जाऊन वायर पकडा असे सांगायचा  आणि त्यांना काही कळायच्या आधीच सोन घेऊन पसार व्हायचे,अशा प्रकारच्या  गुन्ह्याच्या तक्रारी नौपाडा परिसरात वाढल्या नंतर उपायुक्त अविनाश अंबूर, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उप निरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत करून या दोघांचा माग काढला, गणेश करावडे हा घरी राहायचा नाही कधी निळजेला तर कधी घाटकोपरला तर कधी मित्रा कडे असा फिरत राहायचा त्या मुळे तो सापडत नव्हता, पण पोलिसांनी मोठ्या सीताफिने त्याला अटक केली, त्या नंतर साईनाथ गायकवाडला  पकडण्यात आल, साईनाथ गायकवाड हा मोटारसायकल घेऊन खाली तयारी मध्ये उभा राहायचा, करावडे चोरी करून खाली आला की मोटारसायकल वर बसून हे दोघे पळून जायचे, त्यांच्या कडून पोलिसांनी 4,87,500/- रुपयाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 83,000/- रुपयाची होंडा मोटारसायकल, आणि नौपाडाच्या हद्दीतून चोरलेल्या 66,000/- बुलेट मोटारसायकल, आणि होंडा एव्हीएटर असा एकूण 6,30,500/- रुपयाचा माल जप्त केला आहे.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीthaneठाणेGoldसोनं