वरकुटे बु.(ता.इंदापूर) येथे ७० वर्षीय वयोवृृद्ध माता पित्याला त्यांच्याच पोटच्या गोळ्याने (मुलाने) औषधोपचार करण्यास नकार देत, मारहाण केल्याची निंदणीय घटना दि.९ फेब्रुवारी रोजी मौजे वरकुटे बु. येथे घडली असुन याबाबतची याबाबतची फिर्याद प्रताप बाबुराव फाळके.(वय ७०)रा. वरकुटे बु. ता.इंदापूर,जि. पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.
रविंद्र प्रताप फाळके.रा. वरकुटे बु.,ता.इंदापूर जि.पूणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, फीर्यादी पती पत्नी हे वयोवृृृृृद्ध व जेष्ठ नागरिक असुन ते आरोपीचे आई-वडील आहेत. वरील सर्वजण एकत्रीत राहण्यास आहेत.आरोपी याने दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचे आई वडीलांचे आजारपणासाठी औषधोपचार करण्यास व त्यांचा सांभाळ करण्यास नकार देत फिर्यादी वृृृृद्ध माता पित्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली होती.
आई - वडील वयोवृृृृृृद्ध आहेत हे आरोपीला माहीत असताना देखील आरोपीने वृृृृृद्ध आईवडीलांच्या वयाचा विचार न करता त्यांना मारहान केल्याने फीर्यादी यांनी इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे यांची भेट घेवुन घडलेल्या प्रकाराबाबतची माहीती दीली व जेष्ठ नागरिक दांपत्यास न्याय मीळण्याची विनंती केली. घटनेचे गांभिर्य ओळखुन प्र. पो.नि. गोडसे यांनी आरोपीविरोधात आई- वडील, जेष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुसार गुन्हा दाखल करण्याचे संबधीतांना आदेश दील्याने आरोपीवारोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
जेष्ठ नागरिक यांचा त्यांच्या मुलांनी सांभाळ न करणे, त्यांची छळवणुक करणे, त्यांना मानसिक व शारिरीक त्रास देणे, त्यांना घरातुन बाहेर हाकलुन देणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहेत. पुढील काळात घरातील जेष्ठ, वयोवृद्ध नागरिकाच्या बाबतीत वरील प्रकारच्या तक्रारी आल्यास जेष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत वरीलप्रमाणे कडक कारवाई करणार करणार. - इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे.