गाझीपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे दिलदारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उसिया गावात धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)गावातील रहिवासी असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने पत्नीची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. त्यानंतर या माथेफिरू पोलिसाने आपल्या पाच मुलांवरही जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्याने रेल्वेरूळांवर जाऊन ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. दरम्यान, या पोलीस हेडकॉन्स्टेबलने केलेल्या हल्ल्यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी वाराणसी ट्रॉमा सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. ( Police head constable kills wife, attack on five children, then commits suicide)
मिळालेल्या माहितीनुसार उसिसा गावात राहणारे मुंशी यादव पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल पदावर होते. सध्या ते फतेहपूर जिल्ह्यात तैनात होते. जानेवारी महिन्यात ते सु्ट्टी घेऊन गावात आले होते. तेव्हापासून ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले नव्हते. पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या मुंशी यादव यांना त्वचाविकार झाला होता. त्यामुळे ते अतिशय तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा आजूबाजूच्या लोकांनी केला आहे.
दरम्यान, गाझीपूरचे एसपी ओ.पी. सिंह यांनी सांगितले की, हेड कॉन्स्टेबल मुंशी यादव यांनी धारदार हत्याराने पत्नी रीना हिचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या पाच मुलांवर जीवघेणा हल्ला केला. त्याततीन मुले गंभीर जखमी झाली. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने गावाबाहेरील रेल्वे ट्रॅकवरून येत असलेल्या ट्रेनसमोर झोकून घेत आत्महत्या केली. सध्या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.