पोलीस इन्स्पेक्टरचा महिला तहसीलदारासोबत वाद; आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:57 AM2021-03-16T11:57:06+5:302021-03-16T11:57:39+5:30

Crime News of Madhya pradesh: पीडित महिला अधिकारी ही नायब तहसीलदार आहे. तर दतिया पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर शिशिर दास हा आरोपी आहे. महिला तहसीलदार यांची सीहोरमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Police inspector's dispute with female tehsildar; arrested after offensive photo went viral | पोलीस इन्स्पेक्टरचा महिला तहसीलदारासोबत वाद; आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याने उडाली खळबळ

पोलीस इन्स्पेक्टरचा महिला तहसीलदारासोबत वाद; आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याने उडाली खळबळ

Next

महिला महसूल अधिकाऱ्यासोबतच्या वादातून एका पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) तिचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (Police inspector Arrested in Madhya pradesh after lady Nayab tahasildar complaint.)


पीडित महिला अधिकारी ही नायब तहसीलदार आहे. तर दतिया पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर शिशिर दास हा आरोपी आहे. महिला तहसीलदार यांची सीहोरमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. दोघांमध्ये एक जुना वाद सुरु आहे, यावरून दास याने त्या महिला तहसीलदाराला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केले आहे. या वादामुळे दास याने महिला तहसीलदारावर राजीनामा देण्य़ासाठी दबाव आणला होता. 


तेथील एएसपी समीर यादव यांनी सांगितले की, नायब तहसीलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार इन्स्पेक्टर शिशिर दास यांना अटक केली आहे. त्यांच्यावर आयपीसी आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयाने जामिन दिला आहे. 


मध्य प्रदेशमध्ये ही काही पहिलीच घटना नाहीय. काही आठवड्यांपूर्वी एचएएलचा एक इंजिनिअर त्याच्या गावी कानपूरला गेला होता. तेव्हा तिथे त्याने एका 7 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले होते. त्या मुलाकडून त्याने पाणी मागितले होते, तो पाणी देण्यासाठी येताच खोलीचा दरवाजा आतून बंद करत शोषण केले होते. या  मुलाने त्याच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला होता. यानंतर या इंजिनिअरची त्यांनी चांगलीच धुलाई केली होती. 

Web Title: Police inspector's dispute with female tehsildar; arrested after offensive photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.