मुंबई: बोरिवली कोर्टात उभ्या एका वकिलाच्या कारला मालवणी पोलिसांच्या जीपने धडक देत थेट पसार झाल्याचा प्रकार शुक्रवारी सव्वा दोनच्या सुमारास घडला. ऍडवोकेट किशोर शेट्टी असे वकिलाचे नाव असून त्यावेळी ते कोर्टरूममध्ये होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याबाबत सांगितले तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी माफीही मागितली नसल्याचे शेट्टीनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. सदर प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना संपर्क केला असता मी चौकशी करतो असे त्यांनी सांगितले.
बोरिवली कोर्टात वकिलाच्या कारला पोलीस जीपची धडक; माफिही मागितली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 15:29 IST