खोपोली : माहेरहून दिवाळीत कपड्यासाठी दहा हजार रुपये व अंगठी आणली नाही म्हणून खोपोलीतील एका पोलिसाने आपल्या पत्नीला पेटवल्याची घटना घडली. या प्रकारात गंभीर भाजलेल्या पत्नीला जाखोटिया रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी बुधवारी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेचा दीड वर्षापूर्वी खोपोलीतील पोलीस शिपाई अजय उर्फ जीवन सोपान चव्हाण याच्याशी विवाह झाला होता. गतवर्षी दीपावलीच्या सुमारास पहिली दिवाळी म्हणून दहा हजार पोशाखासाठी व अर्धा तोळ्याची पन्ना खडा असलेली सोन्याची अंगठी दिली नाही, म्हणून अजयची आई तानुबाई व भाऊ संतोष सोपान चव्हाण यांनी चिथावणी दिली होती.पीडित महिलेचे वडील रमेश गुलाब साळुंके (४८, रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) यांनी जावयाची मागणी अमान्य केल्याचा राग धरून अजयने पत्नीला मारहाण करणे, अर्वाच्च शिव्या देणे, असा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. मुलीचे वडील व काका यांनी या प्रकाराबाबत खोपोली पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, समजूत काढून त्यांना परत पाठवण्यात आले, या वेळी ते आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले. त्यानंतर अजयने तिला परत येण्यासाठी विनवण्या केल्या. त्यानुसार पत्नी पुन्हा नांदायला आली असता, अजयने पूर्वीच्या रागातून तिला ७ नोव्हेंबर रोजी पेटवून दिले आणि आपण पकडले जाऊ या भीतीने पणतीमुळे आग लागल्याचे सर्वांना सांगितले.ड्रेस, अंगठीसाठी छळपीडित महिला रुग्णालयात असल्याने माहेरील व्यक्तींशी संपर्क करू शकली नाही. अखेर उशिरा वडील व काकांना ही घटना कळताच त्यांनी खोपोली पोलिसांत तक्र ार दाखल केली, त्यानुसार खोपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंड्यासाठी खोपोलीतील पोलिसाने पत्नीला पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:47 PM