पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:59 IST2022-01-17T14:58:18+5:302022-01-17T14:59:25+5:30
Murder Case : मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले.

पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या
बिहारमधील सिवान जिल्ह्यातील एका पोलिसाचे आपल्या मेहुणीशी अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. अनेक महिला पोलिसांशीही तो अवैध संबंध ठेवत होता. हा प्रकार पत्नीला समजल्यानंतर जोरदार भांडण सुरू झाले. पत्नी पती सुधारण्यासाठी आरोपी पतीला सतत बोलत असे. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिचा विरोध करण्यासाठी तिच्या हत्येचा कट रचला. मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले.
सुधीर प्रथम त्याच्या सिवान गावात आला आणि पत्नीला घेऊन पाटण्याला परीक्षेसाठी गेला. परीक्षा संपल्यानंतर ती पतीसोबत सिवानला परतत होती. यादरम्यान सुधीरने संधी साधून पत्नीची हत्या केली. पत्नीची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गोळ्यांचा आवाज कोणाला का आला नाही?
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ८ जानेवारीपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला. सिवानमधील पोलीस स्टेशन हद्दीतील मदेशिलापुर गावात असलेल्या पुलावर ही घटना घडली, परंतु गोळ्यांचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही याबाबत पोलिसांना काही समजू शकलं नाही. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी सुधीर यादवलाही रडारवर घेतले.
पोलिसांनी सुधीरच्या पाठीमागे अनेक छुपे खबरी लावले. हत्येचा तपास करणारे एसएचओ मनोज कुमार यांनी आरोपी सुधीर व्यतिरिक्त मृत पत्नी रिया देवीचा मोबाईल ताब्यात घेतला. पोलिसांनी दोन्ही क्रमांकांचे सीडीआर काढून त्यांचा सखोल तपास सुरू केला. तपासात सुधीरचा मोबाइल पत्नीसोबत अॅक्टिव्ह असल्याचे उघड झाले असून मोबाइलचे लोकेशनही पत्नीच्या मोबाईल लोकेशनला मॅच होत असल्याचे उघडकीस आले होते.
त्याआधारे पोलिसांनी तपास करून सुधीरची चौकशी सुरू केली, त्यात सुधीर यादवने पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. एसएचओ मनोज कुमार यांनी सुधीरची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सुधीरला अटक करून रविवारी कारागृहात पाठवले.
मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो सापडले
चौकशीदरम्यान सुधीरने आपल्या मेहुणीशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे समजत आहे. मेहुणीशिवाय त्याने अनेक महिला पोलिसांशी संबंध ठेवले होते. सुधीरच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे संभाषण आणि फोटो सापडले आहेत. पोलिस मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून सुधीरबाबत अधिक माहिती घेत आहेत. लवकरच जबाब दाखल केल्यानंतर सुधीरला न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.