अमरावती - बडनेरा रेल्वे स्थानकावर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत बुधवारी तीन कुख्यात दहशतवाद्यांना जिवंत पकडले. या दहशतवाद्यांनी सकाळी १०.३० वाजता रेल्वे स्थानक परिसरात शिरकाव केला आणि प्रथमश्रेणी विश्रांतीगृहात घुसून तेथील प्रवाशांना ओलीस ठेवले. ही बाब रेल्वे प्रशासनाला कळताच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी, एटीएस व बीडीडीएस पथकांंनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने परिसराची कसून तपासणी केली. यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, ते बधत नसल्याचे पाहून पोलिसांनी धडक कारवाई केली. यावेळी ग्रेनेडचा वापर करण्यात आला. क्यूआरटी पथकाने सहा राऊंड फायर केले. दहशतवादी जिवंत पकडले गेले. त्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज दुपारी १२.३० वाजता ही मॉकड्रील असल्याबाबत उद्घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. यामध्ये क्यूआरटीचे पोलीस उपनिरीक्षक कपिल मिश्रा यांच्यासह १५ कमांडो, बीडीडीएसचे पोलीस निरीक्षक जयंत राऊत यांच्यासह त्यांची चमू तसेच एटीसीचे हेड कॉन्स्टेबल दीपक श्रीवास यांच्यासह पथकाने सहभाग घेतला. त्यांच्या साहाय्याला श्वानपथक होते. यादरम्यान गोळ्यांचा आवाज ऐकून बडनेरा पोलिसांनीही रेल्वे स्थानकावर धाव घेतली होती.
बडनेरा रेल्वे स्थानकावर मॉकड्रीलचा थरार; प्रवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 19:48 IST
गोळ्यांचा आवाज ऐकून बडनेरा पोलिसांनीही रेल्वे स्थानकावर धाव घेतली होती.
बडनेरा रेल्वे स्थानकावर मॉकड्रीलचा थरार; प्रवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण
ठळक मुद्देबॉम्ब शोधक व नाशक पथकाने परिसराची कसून तपासणी केली.नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. १२.३० वाजता ही मॉकड्रील असल्याबाबत उद्घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.