ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. यामुळे नाबा दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. झारसुगुड़ा जिल्ह्यातील बृजराजनगरमध्ये हा हल्ला झाला आहे. ते तिथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते.
नाबा दास त्यांच्या कारमधून उतरत होते, तेवढ्यात तिथे एएसआयने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या दास यांच्या छातीला लागल्या आहेत. त्यांच्यावर गोळी का झाडण्यात आली हे देखील समजू शकलेले नाही.
या हल्ल्यानंतर बीजेडीचे संतप्त कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते. यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. नबा दास यांच्यावरील हा हल्ला पूर्वनियोजित होता, कारण मंत्र्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत कारण नबा दास यांना पोलिस संरक्षणही देण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले की, गांधी च्चक पोलीस ठाण्याचा अधिकारी एएसआय गोपाल दास यांने नबा दास यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.