मुंबई - फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग न दाखविण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दोन लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार,शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे.तक्रारदाराने ६ ऑगस्ट रोजी एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार, पडताळणी करुन एसीबीने अधिक तपास सुरू केला. आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हाचा तपास गायकर यांच्याकडे होता. याच गुन्ह्यात तक्रारदार यांचा सहभाग न दाखविण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. भायखळा येथील मालमत्ता कक्षाच्या कार्यालयातच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अन्य मालमत्तेबाबत एसीबीकडून तपास सुरू आहे.
पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:36 PM
तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले.
ठळक मुद्देपडताळणी करुन एसीबीने अधिक तपास सुरू केला. त्यांच्या अन्य मालमत्तेबाबत एसीबीकडून तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हाचा तपास गायकर यांच्याकडे होता.