जळगाव - पोलिसांच्या घरी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलिसाचा मुलगा असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जळगाव येथे एका पोलिसाच्या मुलाने घरफोडी केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.
जळगाव येथील एका पोलिसाच्या मुलाने दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. या १६ वर्षीय तरुणांने पोलिस अधिकाऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकूण ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी होळकर यांच्या घरातून एक मोबाइल लंपास झाला होता. तसेच पुन्हा एकदा याच अल्पवयीन मुलास चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. हा मुद्दा हेरून पथकाने संबंधित मुलास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर लोकडे व होळकर यांच्या घरातून चोरलेला संपूर्ण ऐवज देखील काढून दिला.