औरंगाबाद - बीड बायपासपरिसरातील राजेशनगर येथील हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हेशाखेने रविवारी रात्री छापा टाकरून शहरातील सर्वात मोठ्या मॉलचा व्यवस्थापकासह ४ ग्राहक, कोलकाता ,हैदराबाद आणि स्थानिक चार तरूणी, दोन आंटी आणि दोन दलालांना पकडले. यावेळी तेथे अवैध दारूसाठा, रोख रक्कम ,मोबाईल आणि अन्य साहित्य असा सुमारे १ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त केला. दलाल संजय त्र्यंबक कापसे(४४,रा.गणेशनगर),दलाल विनोद टेकचंद नागवणे(रा. सिडको एन-४) , प्रोझोन मॉलचा व्यवस्थापक ग्राहक महमंद अर्शद साजीद अली (२९,रा. चिकलठाणा एमआयडीसी), अमोल दामू शेजूळ (२९,रा.म्हाडा कॉलनी) ,ज्ञानेश्वर सर्जेराव जºहाड(४२,रा. बदनापुर),अजय सुभाष साळवे (२३,रा. आनंदनगर) आणि दोन आंटीचा आरोपीमध्ये समावेश आहे. यावेळी वेश्या व्यवसायाकरीता आणण्यात आलेल्या कोलकाता येथील दोन, हैदराबाद आणि शहरातील एक अशा एकूण चार तरुणींची मुक्तता करण्यात आली. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले की, बीडबायपासलगच्या राजेशनगर येथील एका घरात वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांना दिली.यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कोडे यांनी गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांचे पथक आणि दोन पंच, एक डमी ग्राहक यांना सोबत घेऊन राजेशनगर गाठले. संशयित घरात पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्याला वेश्यागमनासाठी तरूणीची मागणी करण्याचे सांगितले. तेथे गेल्यानंतर दलाल संजय कापसे आणि आंटीने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्यासमोर चार तरूणी उभ्या केल्या.यानंतर त्यांना एका खोलीत जाण्याचे सांगितले. यावेळी पोलिसांच्या डमी ग्राहकाने खिडकीतून इशारा करताच गुन्हेशाखेच्या अधिका-यांनी पंचासमक्ष त्या घरावर धाड टाकली. तरूणींची मुक्तता करण्यात आली आणि आंटी, दलालाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. शिवाय ग्राहकांनाही ताब्या यावेळी तेथे घेण्यात आलेल्या झडतीत दारूच्या बाटल्या, ग्राहकांचे मोबाईल, रोख रक्कम जप्त करण्यात आली. दलाल, आंटी आणि ग्राहकांविरोधात अनैतिक देह व्यापर प्रतिबंधक कलमानुसार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधूकर सांवत हे तपास करीत आहेत.