मुंबई : दिशा सालियन (२८)च्या मृत्यूनंतर तिची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती तिच्या वडिलांनी पोलिसांना केली होती. मालवणी पोलीस संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करून चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.बदनामी करणे हा प्रकार दखलपात्र गुन्हा नसल्याने पोलीस एनसी दाखल करून नंतर न्यायालयाच्या परवानगीने या प्रकरणी चौकशी करतील, असे सूत्रांनी सांगितले. परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांना विचारले असता, मिळालेल्या लेखी तक्रारीनुसार चौकशी सुरू असल्याचे सांगत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले. इमारतीवरून खाली कोसळल्यानंतर दिशा विवस्त्रावस्थेत होती, तसेच ती गरोदर असल्याची अफवा पसरवत असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे़
दिशाची बदनामी करणाऱ्याच्या चौकशीची पोलिसांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 1:57 AM