लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी पोलिसांनी एकाऑटोचा पाठलाग करून त्यातील दोघांना पकडले आणि त्यांच्या जवळून देशी दारूच्या ९६ बाटल्या जप्त केल्या.बेलतरोडीचे पोलीस पथक गुरुवारी रात्री परिसरात गस्त घालत असताना त्यांना बेसा मार्गावर एक ऑटो दिसला. संशय आल्यामुळे पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र ऑटोचालकाने वेगाने ऑटो दामटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टोली परिसरात एका किराणा दुकानाजवळ ऑटो थांबवला. त्यातील आरोपी रवी ईश्वर उपाडे आणि दीपक प्रल्हाद गजभिये या दोघांना ताब्यात घेतले. ऑटोची पाहणी केली असता एका बोरीमध्ये भिंगरी संत्रा दारूच्या ९६ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दारू आणि दारूची तस्करी करणारा ऑटो असा एकूण एक लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
पोलिसांनी पकडली ‘भिंगरी’ : दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:08 IST
बेलतरोडी पोलिसांनी एकाऑटोचा पाठलाग करून त्यातील दोघांना पकडले आणि त्यांच्या जवळून देशी दारूच्या ९६ बाटल्या जप्त केल्या.
पोलिसांनी पकडली ‘भिंगरी’ : दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
ठळक मुद्देदोन आरोपी जेरबंद