शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पोलिसही चक्रावले; जेव्हा पाच वर्षांपूर्वी झालेली 'ती' चोरी ५ नव्हे तर ५० लाखांची होती हे कळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 22:23 IST

५० लाखांची चोरी करून आरोपीने जमीन,फ्लॅट, दुचाकी,चारचाकी खरेदी केले....

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात होती नोंद पाच लाखांच्या चोरीची..

५ नाही ५० लाखांची झाली होती घरफोडी५ वर्षांनी नाट्यमयरित्या उघडकीस : डेक्कन पोलिसांची कामगिरीपुणे : प्रभात रोडवरील फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश करुन महिलेवर चाकू हल्ला करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्या ठिकाणी आपण ५ वर्षांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली व त्यात मोठा माल मिळाला असून त्या पैशातून जमीन, फ्लॅट, मोटार,कार घेतल्याची कबुली दिली. त्यावर पोलिसांनी आपले रेकॉर्ड काढून पाहिले तर त्यात फक्त ५ लाख रुपयांची घरफोडी झाल्याची नोंद होती.आरोपीकडील माल आणि प्रत्यक्ष फिर्याद याचा ताळमेळ बसत नसल्याचे पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फिर्यादीला बोलावल्यावर त्यांनी ५ वर्षापूर्वी खरोखरच ५० लाखांची रोकड व दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. मात्र, पत्नीला याचा मानसिक धक्का बसेल, म्हणून त्यांनी ५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. ते चोरटे पुन्हा त्याच इमारतीत चोरी करायला येतात काय व पकडले जातात काय आणि पूर्वीचा तोही तब्बल ५० लाखांचा गुन्हा एका नाट्यमयरित्या उघडकीस आला आहे. प्रभात रोडवरील ग्रीन सोसायटीत शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया सोमनाथ बंडु बनसोडे (वय ४७, रा़ वारजे माळवाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण व चुलत भाऊ सुधाकर मुरलीधर बनसोडे (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक) याच्या मदतीने याच ठिकाणी २०१५ मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०१५ मध्ये ४ लाख रोख व १ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता.पोलिसांनी सुधाकर बनसोडे याला अटक करुन चौकशी केली. त्यात त्याने ५० लाखांपैकी आपल्या २८ लाख रुपये मिळाले़ त्यातून मांजरी येथे २० लाखाला जागा विकत घेतली. एक कार व मोटारसायकल विकत घेतली. चोरीचे काही दागिन्यांपैकी काही दागिने तारण ठेवून कर्ज घेतले व काही विकल्याचे सांगितले. सोमनाथ बनसोडे याने मिळालेल्या २२ लाख रुपयांतून भूगाव येथे फ्लॅट विकत घेतला. सोन्याचे दागिने मोडले.या दोघाही आरोपींकडून दोन घरे, कार, मोटारसायकल असा ५० लाखांचा माल तसेच तारण ठेवलेले व मोडलेले दागिने असा १२ लाख ९५ हजारांचा माल ५ वर्षांनंतर हस्तगत केला.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, निरीक्षक राजू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सविता भागवत, सहायक फौजदार हरीश्चंद्र केंजळे, हवालदार संजय शिंदे, धोंडोपंत पांचाळ, पोलीस शिपाई विजय चिरमे, सचिन चव्हाण, बाळासाहेब भांगले, प्रविण कांचन यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेdeccan policeडेक्कन पोलीसtheftचोरीThiefचोरArrestअटक