शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रस्त्यांची दुरावस्था पोलिसांना बघवेना! भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 5:53 PM

Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले.

ठळक मुद्देपावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात.

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून तेथील सर्वच रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे वेळ आल्याने भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

            

पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावरील खड्डे पडतात. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी  रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात.  मात्र रस्त्यांवर खड्यांचे  साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने  वाहतूक पोलिसांना या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनीच भिवंडी  शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे. 

         

भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते.  मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.  मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी , कशेळी ते अंजुर फाटा व  मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसान देखील खड्ड्यांमुळे होत असल्याने  याला  सर्वस्वी जबाबदार  वाहतूक पोलिसांना नागरिक  ठरवतात.  त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी की, रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

               

पंधरा दिवसापूर्वी  मनसैनिकांनी खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता.  तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या  संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गावरून काढण्यात आली.  त्यावेळेस तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते.  मात्र त्याही रस्त्यांवर खड्ड्यांनी डोके वर काढले आहेत.  त्यामुळेच वाहतूक पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसbhiwandiभिवंडीPoliceपोलिसPotholeखड्डे