शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

PSI च्या अंगठ्याला दारुड्याने घेतला चावा; भाभा रुग्णालयाच्या डॉक्टरनाही शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 11:34 AM

तक्रारदार सचिन ढवळे (४५) हे वांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहेत.

मुंबई : पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वांद्रे येथे वाद घालणाऱ्या दारुड्याला आवरणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगठ्याचा दारुड्याने कडकडून चावा घेतला. अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्याने भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनाही शिवीगाळ केल्याचे समजते. 

तक्रारदार सचिन ढवळे (४५) हे वांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिस ठाणे अंमलदार कक्षात असताना दत्ताराम मोरे (७०) तेथे आले व त्यांनी दारूच्या नशेत असलेला आरोपी कैलास भोकसे (५०) याने मारहाण केल्याची तक्रार दिली. कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक पोकळे यांनी त्यांची तक्रार ऐकून घेत असताना भोकसे तेथे आला आणि त्याने आरडाओरडा केला. 

मोरे यांनी अन्य दोघांसोबत मिळून हाताने आणि काठीने मला मारहाण केली, असे भोकसे याने पोलिसांना सांगितले. तसेच माझ्या विरोधात खोटी तक्रार का दाखल करून घेतली, असा जाबही विचारला. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता, त्यामुळे उपनिरीक्षक पोकळे यांनी भोकसे याला शांत राहायला सांगत पोलिस नाईक मोरे यांच्यासोबत भाभा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. भोकसे शिवीगाळ करत असल्याने ढवळेंनी त्याला रायटर कक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. आक्रमक होत त्याने उपनिरीक्षक ढवळेंना शिवीगाळ करत डाव्या हाताच्या अंगठ्याचा कडकडून चावा घेतला.

भोकसे विरोधात  गुन्हा दाखलपोलिस उपनिरीक्षक ढवळेंना शिवीगाळ करत त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा कडकडून चावा घेतला. यात ढवळे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानुसार नशेत असलेल्या भोकसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वाहनचालक आहे.