नवी मुंबई : महिला पोलिसाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने याबाबत तक्रार आयुक्तांकडे केली असता चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले अमित शेलार यांनी २०१० मध्ये पोलीस नाईक पदावर असताना वाशी पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक झालेली होती. तेथे कार्यरत असलेल्या महिला पोलिसाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. शिवाय त्यावेळी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मागील दीड वर्षात लोणावळा, खारघर तसेच सीबीडी येथे नेवून अनेकदा बलात्कार केल्याची महिलेची तक्रार आहे.आयुक्तांनी महिला सहाय्यकता कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्याकडे तपास सोपवला होता. तपासाअंती शेलारविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:25 AM