नवी मुंबई : ड्रग्ज विक्रीमध्ये सहभागी असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या शोधात नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहाशे जणांच्या फाैजफाट्यासह नवी मुंबईत सर्जिकल स्ट्राइक केले. त्यामध्ये ७५ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात चालत असून त्यात नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून आला होता. त्या पार्श्वभूमीवर नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकण्याचा नियोजनबद्ध प्लॅन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तयार केला होता. मागील काही दिवसांपासून नायजेरियन नागरिकांची माहिती जमवली जात होती. त्यानुसार पाेलिसांनी माेठ्या फाैजफाट्यासह कारवाई केली.
खिडकीतून फेकल्या वस्तूपोलिस धडकताच काहींनी त्यांच्याकडील अमली पदार्थ राहत्या इमारतींच्या खिडकीतून खाली फेकले. मात्र पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरलेला असल्याने फेकलेले पदार्थ पोलिसांच्याच समोर पडत होते.
उशिरापर्यंत चालली कारवाईनवी मुंबईसह पनवेल परिसरात टाकलेल्या छाप्यांत ७५ विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात महिलांचा व दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून इतर ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती मिळवली जात आहे.
वाशी जुहूगाव सेक्टर ११ येथे नवी मुंबई पोलिसांनी नायजेरियन नागरिकांची तपासणी करण्यात आली. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या भाड्याच्या घरांना कुलूप लावण्यात आले. (छाया : संदेश रेणोसे)