शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

२७ लाखांच्या बोगस कर्जवाटपातील ‘त्या’ लाभार्थींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 5:49 AM

पारोळा बोगस कर्जवाटप प्रकरण : गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

पारोळा : अहमदाबाद येथील नम्रा फायनान्स कंपनीच्या पारोळा शाखेत बोगस कर्ज वाटप करून २७ लाखांचा अपहार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी चारही आरोपी पसार असून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. या पथकात पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, सुधीर चौधरी, अभिजित पाटील आदींचा समावेश आहे.

पारोळा शहरातील महावीरनगर येथे अहमदाबाद येथील नम्रा फायनान्सची शाखा असून, सन २०१६ पासून या शाखेचे काम सुरळीत होते. विविध प्रकारच्या कर्ज योजनांचा लाभ  या शाखेतून दिला जात होता. मात्र, सप्टेंबर २०२१ मध्ये या शाखेत कार्यरत असलेले रमेश महाजन (रा. जवखेडा, ता. एरंडोल) यांची शाखा व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली. याचवेळी अमोल पाटील (रा. मठगव्हाण, ता. अमळनेर), अक्षय वसंत महाजन (रा. जवखेडा, ता. एरंडोल) व तुषार पवार (रा. मठगव्हाण, ता. अमळनेर) यांनी संगनमत करून अपहार केला.

आधार कार्डांमध्ये फेरफारचौघा आरोपींनी  वेगवेगळ्या लोकांचे आधार कार्ड जमा केले. सर्व आधार कार्ड व इतर पुरावे कॉम्प्युटरद्वारे एडिटिंग केले. कार्डवर नाव बरोबर तर पत्ता चुकीचा अशा वेगवेगळ्या प्रकारे एडिटिंग केले व ते कर्जप्रणालीत टाकले. तब्बल ६९ लोकांच्या नावे कर्जाची प्रकरणे टाकली.

मुद्रा योजनेचा दुसऱ्यांचा लाभ लाटलाकोविड काळामध्ये केंद्र सरकारतर्फे गरजू, छोट्या व्यावसायिकांना मुद्रा लोन वितरण करण्याची योजना होती. त्या योजनेच्या आधारावर या चारही जणांनी ६९ लोकांना मुद्रा लोन योजनेत कर्ज दिले. एकूण २७ लाख ३३ हजार रुपये कर्ज वितरण केले. सुरुवातीला  प्रत्येक बनावट लाभार्थ्यांच्या नावावर दोन ते चार हप्ते या चौघा आरोपींनी स्वतःच्या पैशांमधून भरले होते. काही दिवसांनंतर एकेकाने कंपनीचा राजीनामा दिला. ऑडिटच्या दरम्यान अपहाराचा प्रकार पुढे आला.  तोपर्यंत हे सर्व जण राजीनामा देऊन पसार झाले होते.