बदलापूर - बदलापूरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजेश पातकर यांच्यावर बुधवारी सयांकाळी झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले आहे. मात्र, हा गोळीबार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला हे पातकर यांनाही अजून स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन या गोळीबारामागे खंडणीशी संबंध आहे का याची चाचपणी करित आहे. या गोळीबाराचा प्रकार पाहता पातकर यांना घाबरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. बदलापूर - कर्जत रोडवरी संजेश पातकर यांच्या कार्यालयाबाहेर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत चर्चा करित होते. त्यावेळेस दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पातकर यांच्या खाडीच्या बाजुला दुचाकी उभी करुन खाली उतरले. आणि त्यांनी पातकर यांच्या दिशेने दोन गोळ्या घाडुन पळ काढला. पहिली गोळी चालल्यावर लागलीच पातकर आणि त्यांचे सहकारी मित्र ह सतर्क होऊन पळाले. त्यामुळे त्यांच्या या गोळीबारातून बचाव झाला. या प्रकारानंतर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक गोळी ही कार्यालयाच्या काचेवर खालच्या दिशेला मारली होती. त्यावरुन पातकर यांना घाबरविण्यासाठी हा प्रकार घडविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, याआधी पातकर यांना काही वर्षापूर्वी खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्या प्रकरणाची याक संबंध आहे की नाही याची चाचपणी पोलीस करित आहेत. तर दुसरीकडे व्यावसायिक वादातून प्रकार घडला आहे का याचा तपास पोलीस करित आहेत. दरम्यान, बदलापूरात गोळीबाराचे प्रकार हे सातत्याने वाढत आहेत. त्यातच बदलापूरातील गुन्हेगारांकडे सर्रास बेकायदेशिररित्या बंदुका ठेवण्याचे प्रकार वाढल्याने या गुन्हेगारी वृत्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही पोलीस करित आहेत.