शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पोलीस पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून डॉक्टर पत्नीची सेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 5:34 PM

Police's Wife started Service as Doctor : त्या म्हणतात मला थांबणे शक्य नाही...

ठळक मुद्देपतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी बांधत त्या पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून पतीने सुरु केलेल्या समुपदेशनाच्या सेवेत उतरल्या.

मनीषा म्हात्रेमुंबई : कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असताना, पोलीस निरिक्षक असलेल्या पतीने साथ सोडली. पण त्या खासगी प्रसूती रुग्णालयात डॉक्टर असल्याने मनीषा झेवियर रेगो यांना थांबणे शक्य नव्हते. पतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी बांधत त्या पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून पतीने सुरु केलेल्या समुपदेशनाच्या सेवेत उतरल्या. आपला क्वॉरटाईनचा कालावधी पूर्ण होताच, त्यांनी रुग्णालयात जाऊन आपली सेवा पुन्हा सुरु केली. कोरोनाच्या काळात दिवस-रात्र त्यांची ही अविरत सेवा सुरु आहे.         

कॉर्पोरेट सेक्टरची महागडी नोकरी झुगारुन जनतेच्या सेवेसाठी १९९३ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झालेले झेवियर रॉकी रेगो सर्वाच्याच जवळचे होते. एमपीएससी परीक्षेत ते महाराष्ट्रात चौथे आले होते. दबंग अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. कोरोनाच्या काळातही रस्त्यावर उतरून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यांच्या पत्नी मनीषा या डॉक्टर असल्याने दोघेही २४ तास कार्यरत होते. कोरोना महामारीच्या काळात खचलेल्या, नैराश्येत असलेल्या जवळपास ७०० कुटुंबांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करत, कर्तव्यापलीकडे जात त्यांच्यापर्यंत रेगो आणि त्यांच्या पत्नीने मदत पोहचवली. पोलीस दलात येणाऱ्या नवीन तरुणासाठी ते नेहमीच आदर्श ठरत होते. गेल्या वर्षी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना रेगो यांना कोरोनाची बाधा झाली. आणि या रोगाशी लढताना १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.          

रेगो यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला. नेहमीच आधार ठरणाऱ्या पतीची साथ सुटल्यानंतर डॉ. मनीषा यांनी खचून न जाता पतीच्या निधनाच्या ३ दिवसांनंतर त्यांचे समुपदेशनाचे कार्य पुढे नेले. रेगो यांच्या निधनाचे दुःख पचवणे शक्य नव्हते. स्वतःला कशात तरी व्यस्त ठेवणे गरजेचे होते. अशात, डॉ. मनीषा यांनी सोशल मिडियावरुन कोरोनाबाबत जनजागृती सुरु केली. कोरोनाच्या कठीण काळात सकारात्मक राहण्याचे आवाहन करत कोरोनापासून बचावासाठी आणि कोरोनाची लागण झाल्यावर काय करावे व क़ाय करू नये, याबाबत त्यांनी मार्गदर्शन सुरु केले. आपला १४ दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण करत त्या पून्हा सेवेत रुजू झाल्या. डॉ. मनीषा या सध्या बोरीवलीच्या मँटर्निटी होममध्ये कार्यरत आहेत. कोरोना काळात महिन्याला १५ ते २० प्रसूती यशस्वीरित्या करत आहेत. या सेवे बरोबर त्यांचे समुपदेशनाचे कार्य सुरु आहे.       

डॉ. मनीषा सांगतात, मला थांबून चालणार नाही. सध्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांंना गरज आहे. गर्भवती महिलांना तर जास्त आवश्यकता आहे. हे दिवस लवकर जातील. जगावर आलेल्या संकटाचे भान ठेवून नागरिकांनी सकारात्मक राहून जबाबदारीने वागायला हवे. आजही नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसत आहे. त्यांनी शासनाच्या नियमाचे पालन करत काळजी घ्यायला हवी. 

सत्य स्थितीला न नाकारता..

नागरिकांनी सहकार्य करायला हवे. सध्या डबल मास्क वापरणे गरजेचे मात्र इथे सिंगल मास्कही लावयला तयार नाही. यात वैद्यकीय रित्या अजून अलर्ट होणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार करून चालणार नाही. भुतकाळ, भविष्यकाळाच्या विचारात न जगता वर्तमान काळात सकारात्मक विचारांनी  राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईDeathमृत्यूdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या