रांची : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना ईडीचे विशेष न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी ८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा केंद्रीय तुरुंगात पाठविण्यात आले.
पूजा सिंघल यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. याच प्रकरणात त्यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांची १३ दिवस चौकशी केल्यानंतर २० मे रोजी तुरुंगात पाठविण्यात आले होते. ईडीने रांची आणि मुजफ्फरपूरमध्ये पूजा सिंघल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विशाल चौधरी आणि निशित केशरी यांच्या ठिकाणांवर दोन दिवसांपूर्वीच धाडी टाकल्या होत्या. या ठिकाणांवरून कोट्यवधींचे दस्तऐवज जप्त करण्यात आले होते.
निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर धाडी ईडीने सिंघल यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या हरमू हाउसिंग कॉलनी स्थित ठिकाणांवर बुधवारी धाडी टाकल्या. आणखी एक निकटवर्तीय विशाल चौधरी यांनी दहा दिवसात दहा कोटी रुपयांचे ट्रान्जेक्शन (व्यवहार) केले होते. विशाल चौधरी आणि बिल्डर निशित केशरी यांचेही एकमेकांशी संबंध आहेत.