शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा
2
IND vs SA: भारताच्या संघात ३ बदल होणार? एका नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळणार
3
"बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शर्ट बदललं आणि गर्दीत..."; आरोपी शिवाचा खळबळजनक खुलासा
4
"उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरले फक्त खान"; राज ठाकरेंचं वर्मावर बोट, काय बोलले?
5
'शक्तिमान' रिटर्न्स! ६६ व्या वर्षी शक्तिमान बनले मुकेश खन्ना; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
"मुख्यमंत्री असताना केवढे केले होते अनधिकृत चाळे", आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
7
Maharashtra Election 2024 Live Updates: मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्याला निलंबित केलं होतं, ते योग्य होतं का? - संजय राऊत
8
Sanjay Roy : "मी निर्दोष, मला अडकवण्यात आलंय"; संजय रॉयचा कोर्टात ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांसमोर आरडाओरडा
9
काळाने घातला घाला! डेहराडूनमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर
10
ट्रक ड्रायव्हर केपी, तीन हजार कोटींचे मालक कसे झाले? प्रकाश आबिटकर यांचा सवाल
11
'रोजरोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे', भाजप उमेदवार भीमराव केरामांचे बेताल वक्तव्य
12
Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख
13
'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण
14
भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
15
धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...
16
TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार
17
"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एकर जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले
18
'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?
19
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; Hindalco, ONGC, HCL Tech मध्ये तेजी
20
हाती मशाल अन् आदित्य ठाकरेंचा प्रचार! शिवसेनेच्या प्रचार रॅलीत आदेश बांदेकर, व्हिडिओ व्हायरल

पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पुण्यातून कांड, अचानक सुरू झाला पॉर्न Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 9:29 AM

पतंजली योगपीठशी संबंधित आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते.

पुणे - ऑनलाईन मिटींग, झुमवरील बैठकांमध्ये अनेकदा काही मजेशीर आणि हास्यास्पद घटना घडतात. ऑनलाईन बैठकांसाठी अप टू डेट अशा प्रकारात सर्वचजण असतील असे नाही, त्यामुळेच या घटना यापूर्वीही घडल्याचं आपण पाहिलं आहे. आता, बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक होती, या बैठकीत अचानक उपस्थित एका व्यक्तीकडून पॉर्न व्हिडिओचं स्ट्रीमिंग करण्यात आलं. त्यानंतर, या झुम मिटींगमध्ये एकच गोंधळ उडाला. या बैठकीत काही महिलाही सहभागी होत्या. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पतंजली योगपीठशी संबंधित आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते. तेव्हा पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं पॉर्न व्हिडीओ सुरू केला. तरुणानं हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी माहिती व तंत्रत्रान कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. पुण्यातील येरवडास्थित कॉलेज कॅम्पसजवळ राहणाऱ्या आकाश नामक व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार नोंदवली. पतंजलीकडून एक तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय सिंह यांनी दिली.

नेपाळमध्ये पतंजलीच्या दिव्या फार्मसीची उत्पादने बॅन

पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या दिव्या फार्मसीला एक मोठा धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच World Health Organistion (WHO) मानकांची पूर्तता न केल्यामुळे नेपाळ या देशाने दिव्या फार्मसीला (Divya Pharmacy) काळ्या यादीत (Black List) टाकले आहे. हे कठोर पाऊल केवळ दिव्या फार्मसीच्या बाबतीच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरुद्ध उचलण्यात आले आहे. नेपाळच्या औषध नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयानंतर देशातील पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. विभागाने जारी केलेल्या नोटीशीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत.

टॅग्स :PuneपुणेpatanjaliपतंजलीCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन