जयपूर - अजमेर जिल्ह्यातील ब्यावर सर्कलमधील पोलीस उपधीक्षक हिरालाल सैनी यांचा एका महिला शिपायासोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी त्यांना निलंबित केले आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस उपाधीक्षक हिरालाल सैनी आणि एक महिला शिपाई स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेच्या पतीने नागौरमधील चितावा पोलीस ठाण्यात याची तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. ही तक्रारसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करून सैनी आणि सदर महिला शिपायाला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला शिपायाच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, ७ मे २००१ मध्ये त्याचा विवाह नागौरमधील एका तरुणीशी झाला होता. त्यानंतक २००८ मध्ये त्याच्या पत्नीची नोकरी राजस्थान पोलिसांमध्ये लागली होती. तिला सहा वर्षांचा एक मुलगाही आहे. तक्रारीत सांगितले की, अजमेर जिल्ह्यातील ब्यावर पोलीस उपाधीक्षकाच्या पदावर राजस्थान पोलीस सेवेतील अधिकारी हिरालाल सैनी कार्यरत आहेत. १३ जुलै २०२१ रोजी त्यांच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस लावले होते. त्या स्टेटसमध्ये लावलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि पोलीस उपधीक्षक हिरालाल सैनी स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करताना दिसत होते.
दरम्यान, सोशल मीडियावर हीरालाल सैनी आणि महिला शिपायाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी ८ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून विभागीय चौकशीचे आदेश देत हिरालाल सैनी यांना निलंबित केले. निलंबनादरम्यान, हीरालाल सैनी यांचे मुख्यालय जयपूर राहील. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा २ मिनिटे ३८ सेकंदांचा आहे. हीरालाल सैनी बऱ्याच काळापासून ब्यावरमध्येच तैनात आहेत.