शहापूर - महावितरणचे सहायक अभियंता अविनाश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वीजचोरांविरोधात भरारी पथकाने कारवाई केली. त्यात लेनाड गावाजवळ समृद्धी महामार्गाची कामे करण्यासाठी नेमलेल्या कंत्रादारांकडून मीटर न घेता बेकायदा वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले. एकूण तीन ठिकाणी बेकायदा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यामध्ये सरासरी सहा हजार युनिटची वीजचोरी पकडली.यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व अनेक गावांत पथकाने कारवाई केली आहे. त्यामध्ये ८६ लाख रुपये वीजचोरांकडून वसूल केले होते.
समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराकडून वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 11:27 PM