बडोद्याची (Vadodara) ड्रामा आर्टिस्ट प्राची मौर्य मर्डर (Prachi Maurya Murder Case) केसमध्ये अॅडिशनल सेशन कोर्टचे न्यायाधीश पी.एम.उनादकट यांनी आरोपी वसीम मलिकला दोषी ठरवलं आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. प्राची आणि वसीममध्ये प्रेमसंबंध होते. ब्रेकअपनंतर आरोपी वसीमने प्राचीची गळा दाबून हत्या केली होती.
ही घटना एप्रिल २०१९ मधील आहे. इथे बडोद्यातील यूनायटेड गरबा ग्राउंडजवळ प्राची मौर्यचा मृतदेह सापडला होता. प्राची अपोलो स्टुडिओमध्ये ड्रामा आर्टिस्ट म्हणून काम करत होती. २४ एप्रिल २०१९ ला दुपारी २.३० वाजता बडोद्याहून खंभातला ड्रामा शोसाठी गेली होती. शो रात्री दहा वाजता संपला. त्यानंतर ती बडोद्यासाठी निघाली. रात्री बडोद्याला पोहोचल्यावर प्राचीचा एक सहकारी अंकित शर्मा तिला घरी सोडण्यासाठी जात होता.
त्याचवेळी वसीम तिथे आला आणि प्राचीसोबत भांडू लागला होता. वाद वाढल्यावर प्राचीने अंकितला तेथून जाण्यास सांगितलं. यानंतंर वसीमने प्राचीचा गळा आवळून तिची हत्या केली होती. सकाळी आठ वाजता प्राचीचा मृतदेह स्थानिक लोकांना दिसला होता आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी चौकशी केली आणि आरोपी वसीमला अटक केली होती.
ही केस कोर्टात सुरू होती आणि सरकारी वकिल पी.एन.परमार यांनी सांगितलं की, वसीम मृतदेह सोडून पळून गेला होता. जेव्हा त्याला आठवलं की, मोबाइल प्राचीजवळच आहे तर तो परत आला होता. तेव्हा प्राची जिवंत होती. हे बघून वसीमने पुन्हा तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह त्याने लपवला होता.
म्हणजे वसीमचा उद्देश तिला जीवे मारणं हाच होता. यासोबतच पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन आणि इतर पुरावे गोळा केले होते. जे कोर्टात सादर करण्यात आले. पुरावे आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपी वसीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.