मुंबई: गेल्या १४ वर्षे मुंबईत कायद्याचा सराव करणाऱ्या ७२ वर्षीय बनावट वकिलाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. बीकेसी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला वांद्रे पश्चिमेतील पाली हिल येथील रहिवासी असून मोरदेकाई रेबेका जौब उर्फ मंदाकिनी काशिनाथ सोहिनी असे या महिलेचे नाव आहे. तसेच तिने अनेक कोर्टात प्रॅक्टिस केल्याची धक्का दायक बाब उघडकीस आली आहे.पोलिसांनी १५ जुलै रोजी तिची ओळखपत्रे पडताळून पाहण्यासाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु ती त्यांच्या समोर हजर झाली नाही. शनिवारी जेव्हा सोहिनीने पोलीस ठाण्यात जाऊन तिची पदवी आणि तिचे आधारकार्ड तसेच वकालतनामा सादर केला तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची विश्वासार्हता पडताळून पाहिली. त्यात तिची कागदपत्रे आणि कायद्याचा सराव करण्याचा परवाना बनावट निघाला. या फसवणुकीची माहिती देण्यासाठी पोलिसांनी आता महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलशी संपर्क साधला आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सोहिनीविरोधात बोरिवली येथे राहणारे वकील अकबरअली मोहम्मद खान (४४) यांनी तक्रार दाखल केली होती. सोहिनी ही वकील नसूनही मुंबईतील कौटुंबिक आणि इतर कोर्टात अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असल्याचा दावा त्यांनी केला. बीकेसी पोलिसांनी सोहिनीला अटक करून रविवारी वांद्रे येथील कोर्टात हजर केले. “आरोपी महिलेने १९७७ मध्ये लॉ कॉलेजमध्ये सरकारी कायद्याच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतले आहे. मध्ये. मात्र तिच्याकडे वैध पदवी नाही, तरी देखील ती मुंबईतील कौटुंबिक आणि सत्र न्यायालयासह विविध न्यायालयात प्रॅक्टिस करत होती. एक वर्षापूर्वी मला तिची बनावट ओळख कळली. तेव्हापासून मी तिचा पाठलाग करत होतो, असे खान यांनी पोलिसाना सांगितले. मी ऑटो रिक्षा चालवून कायद्याचा अभ्यास केला आणि खूप मेहनत करून वकील झालो. असे खोटे लोक वकिली व्यवसायाची बदनामी करत आहेत. ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. त्यांनी वेळोवेळी बार कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या वकिलांची पडताळणी केली पाहिजे, असेही खान पुढे म्हणाले.
आम्ही आरोपी महिलेला अटक केली आहे आणि तिला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने तिला २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे,” असे बीकेसीमधील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.