बिहारच्या (Bihar) जहानाबादमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेयसी पाच महिन्यांची गर्भवती झाल्यावर प्रियकराने लग्नास नकार दिला. अशात प्रेयसीने हार न मानता ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दबाव टाकला तेव्हा प्रियकर पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलिसांनी नंतर दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
तरूणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, प्रियकर सोने लाल कुमारने मुन्नी कुमारीला फसवलं. लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत त्याने संबंध ठेवले आणि जेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती झाली तर त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. नंतर प्रेयसीने याची तक्रार महिला पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत चौकशी सुरू केली. तिकडे प्रियकर सोनेलाल कुमारला समजलं की, प्रेयसी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तो घाबरला. तो गपचूप पोलीस स्टेशनमध्ये आला. जिथे पोलिसांनी दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं.
तरूणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, दोघेही काको प्रखंडच्या काली येथे राहणारे आहेत आणि दोघांची भेट रोज होत होती. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरसंबंध झाले. प्रियकर सोनेलाल कुमारने तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. यादरम्यान ती दर्भवती झाली. अचानक तिची तब्येत बिघडल्याने कुटुंबिय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तरूणी गर्भवती असल्याचं सांगितलं. तेव्हा कुटुंबिय चिंतेत पडले. इथे दोघांच्या प्रेमाचं त्यांना समजलं.
तरूणीचे कुटुंबिय दोघांचं लग्न लावून देण्यास तयार होते. पण प्रियकर सोनेलाल लग्नास नकार देत होता. पोलिसांनी प्रियकराला समजावलं. ज्यानंतर दोघांचं पोलीस स्टेशनच्या जवळच्या मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. यावेळी दोघांना बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती.