नवी मुंबई - कोपरखैरणे येथे आपसातील जुन्या वादातून दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे. एकमेकांविरोधात राजकीय चर्चा केल्याने त्यांच्यात वाद उफाळून आल्याने हा प्रकार घडला. त्यानुसार दोन्ही गटातील पंधरा जणांविरोधात कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरखैरणे सेक्टर १२ येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी जाफर युसुफ पटेल (५४) व मोबिन हुसैन पटेल (४३) यांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.त्यानुसार दोन्ही गटातील पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांविरोधात राजकीय चर्चा होत असल्याच्या कारणातून त्यांच्यात जुना वाद उफाळून आला. यादरम्यान दोन्ही गट समोरासमोर आले असता, त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानुसार एका गटात मोबिन हुसैन मिया पटेल, रिजवान पटेल, इरफान पटेल, जाफर पटेल, मोईश पटेल, अशफाक पटेल, फरहान पटेल, आवेश पटेल व कयेश पटेल यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात जाफर युसूफ पटेल, नवीन पटेल, हनिफ पटेल, शोएब पटेल, तौषिफ पटेल, साजेब पटेल, एसुफियान पटेल व हर्षद पटेल यांचा समावेश आहे. त्या सर्वांविरोधात कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण खैरणेचे राहणारे असून त्यांच्यात यापूर्वी देखील छोट्या मोठ्या वादाचे प्रकार घडले आहेत. त्यापैकी काही जणांवर यापूर्वी विविध प्रकारचे गुन्हे देखील दाखल आहेत. त्यांच्यातल्या या हाणामारीच्या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, दोन्ही गटांच्या पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 2:48 AM