नवीन पनवेल : निर्माता विक्रम धाकतोडे याला अहमदनगर येथे ‘टर्री’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नीने अमानुष छळ आणि फसवणुकीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निर्माता विक्रम धाकतोडे यांच्या पत्नीने विक्रमने केलेल्या अमानुष छळाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून आरोपी विक्रमने पत्नीकडून पैसे उकळले. गुंतवणूक केलेल्या कंपनीचे सर्व अधिकार मिळणार असे आमिष दाखवून विक्रम कन्सल्टन्सी आणि प्रियामो एंटरटेनमेंटचे आर्थिक व्यवहार पत्नीच्या अकाउंटवरून करून ओळखपत्रही पत्नीचे दाखविले.
विक्रमने संबंधित महिला ही बहीण असल्याचे खोटे सांगत तिची फसवणूक केली, आणि त्यांचे बहीण भावाचे नाते नसून शारिरीक संबंध असल्याचे पत्नीला कळताच त्याबद्दल कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर इच्छेविरुद्ध संबंध ठेऊन मारहाण आणि शिवीगाळ करून पत्नीचा अमानुष छळ केल्याप्रकरणी विक्रम याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पनवेल शहर पोलिस ठाण्यात पती विक्रम धाकतोडे विरुद्ध गुन्हा दाखल केला.