शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर जप्त 

By नितीन पंडित | Published: February 20, 2024 4:10 PM

या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत.

भिवंडी: ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तीन कंटेनर मधून आणला जात असलेला गुटखा ,जर्दा असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघा चालकांना अटक केली आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी महामार्गावरून होणाऱ्या गुटखा तस्करीवर पाळत ठेवण्याचे आदेश देत कार्यक्षेत्राच्या हद्दीतील अवैध दारु, जुगार,अंमली पदार्थ तसेच मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे कामी व त्यास प्रतिबंधक करणेकामी सुचना दिलेल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,पोलिस हवालदार उमेश ठाकरे,हनुमंत गायकर, भगवान सोनावणे,सुहास सोनावणे,हेमंत विभुते,धनाजी कडव,संतोष सुर्वे,पोलिस नाईक जितेंद्र वारके,योगेश शेळकंदे, स्वप्नील बोडके या पोलिस कर्मचाऱ्यांचे ठाणे ग्रामीण जिल्हयात अमली पदार्थ,प्रतिबंधीत गुटखा,अवैधदारु जुगार याचेबाबत माहीती मिळवुन कारवाई करणेकामी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. 

पोलिस पथकास नाशिक मुंबई महामार्गा वरून गुटखा व प्रतिबंधित तंबाखू यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील येवई गावाच्या हद्दीतील शामीयाना धाब्याचे समोरील रस्त्यावर कांती मोटार्स या दुकानाच्या समोर सापळा रचला.संशयित तीन कंटेनर तेथे उभे असलेले आढळून आले.या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व प्रतिबंधित ३ कोटी ५५ लाख १४ हजार ३१० रुपये किमतीचा जाफरानी जर्दा तंबाखू,गुटखा याची  वाहतुक करीत असताना आढळून आला.पोलिस पथकाने या कंटेनर वरील ताहीर सिताब खान,मोहम तारीफ हबीब खान,जाहुल यासीन हक सर्व रा.राजस्थान यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिन्ही चालकांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी